Share

केंद्र सरकारने आता शहाणपणाची भूमिका घ्यावी; शरद पवारांचा सल्ला

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई : पंजाबचे शेतकरी कृषी  कायद्यांच्या विरोधात गेले दहा दिवस आंदोलन करत आहेत. याचा फटका पुण्याच्या बाजारपेठेला आता थेट बसू लागला आहे. देशातल्या गहू आणि तांदळाच्या बाजारपेठा पंजाबवर मोठ्याप्रमाणात विसंबून आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विशेषतः पुण्याच्या बाजारपेठेत बासमती तांदळाचा व्यापार अस्थिर होऊ लागला आहे.

घटलेली आवक, वाढलेल्या किमती आणि माल वाहतूकदारांची मनमानी अशा तिहेरी झळा पुण्याच्या बाजारपेठेला बसत आहे.दरम्यान, चर्चेच्या पाचव्या फेरीनंतरही सरकारला शेतकऱ्यांचं समाधान करण्यात अपयश आलं आहे. तर दिल्लीत शेतकऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला सावधगिरीचा इशारा दिला आहे.

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चालले आहे. आता हे आंदोलन फक्त दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाही. देशभरातील शेतकरी यात सहभागी होतील आणि आपल्या पद्धतीने प्रश्न सोडवतील. त्यामुळे सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सल्ला दिला आहे.

ज्यावेळी पंजाब व हरयाणातील शेतकरी रस्त्यावर येतो, त्याची फार गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे होती. पण, दुर्दैवानं ती घेतलेली दिसत नाही. मला स्वतःला असं वाटतं की, हे असंच जर राहिलं, तर ते दिल्लीपुरतं सीमित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतली. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी, अशीच माझी अपेक्षा आहे,’असा सल्लाही पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!