नवी दिल्ली : सिंगापूरच्या ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’ या वृत्तपत्राने पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या लसनिर्मिती संस्थेचे प्रमुख अदर पूनावाला यांचा समावेश जगातील सर्वात मोठे लस उत्पादक म्हणून वर्षांतील सहा महत्त्वाच्या आशियाई व्यक्तींमध्ये केला असून त्यांना ‘एशियन ऑफ दी इयर ’ घोषित करण्यात आले आहे.
करोनाप्रतिबंधासाठी संशोधन व लस उत्पादनासाठी एकूण सहा जणांची निवड या वृत्तपत्राने केली आहे. अदर पूनावाला हे सीरम इन्स्टिटय़ूटचे प्रमुख असून त्यांनी अॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केलेल्या कोविड लशीचे उत्पादन सुरू केले आहे. सन्मान यादीत चीनचे संशोधक झांग योंगझान यांचाही समावेश असून ते व त्यांच्या चमूने सार्स सीओव्ही २ विषाणूची जनुकीय संकेतावली सर्वप्रथम शोधून काढली.
या मानकऱ्यांत चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉ. रुइची मोरिशिटा आणि सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग यांचाही समावेश आहे. त्यांनी लसनिर्मितीत मोठे काम केले आहे. दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांच्या कंपनीने लस तयार करून वितरणाची जबाबदारी घेतली असून त्यांचाही यादीत समावेश आहे. या सर्वाचा उल्लेख ‘व्हायरस बस्टर्स’ असा करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लसीच्या प्रगतीसंबंधी आढावा घेण्यासाठी काल सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. दरम्यान ‘सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये तयार करण्यात येणारी कोरोनावरील ‘कोविशिल्ड’ लस ही देशात पहिल्यांदा वितरित केली जाणार आहे. या लसीची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी असणार आहे,’ असे सीरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले.
दरम्यान, ‘कोविशिल्ड’ लस पूर्णपणे सुरक्षित असून, तिच्या तिसऱया चाचणीकडे लक्ष आहे. ‘कोविशिल्ड’ लस घेतल्यानंतर लोकांना रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही, शिवाय या लसीमुळे कोरोनाचे संक्रमणही रोखण्यात येईल’ असे सीरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- सिडनी टी 20 पूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का; भेदक गोलंदाजाची मालिकेमधून माघार
- राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत म्हणाले, ‘महाराष्ट्रातही सरकार पाडण्याची चर्चा’
- मंत्रिपद गेलं तरी बेहत्तर पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही – विजय वडेट्टीवार
- ‘रावण खलनायक नव्हता’असं म्हणणारा सैफ अली खान होतोय ट्रोल
- ‘हिंदू भावना दुखावल्यास सहन करणार नाही’, सैफवर भडके भडकले राम कदम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

