Share

‘हिंदू भावना दुखावल्यास सहन करणार नाही’, सैफवर भडके भडकले राम कदम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अलीकडेच मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने ‘आदिपुरुष’ मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हटले की, या चित्रपटात लंकेशची व्यक्तिरेखा वाईट नसून मनोरंजक आहे. तो म्हणाला, ‘ एक अशा राक्षस राजाची भूमिका वठवणं रंजक आहे. यामध्ये सीताचं अपहरणाच्या औचित्यातून रावणाची रामासोबत लढाई सूड उगविण्यात दाखवली जाईल, जी लक्ष्मणाने रावणाची बहिण शुर्पणखाचं नाक कापल्यामुळे सुरू झाली होती.

यावरच ‘हिंदू भावना दुखावल्यास सहन करणार नाही’ भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी सैफ अली खानवर जोरदार टिका केली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘आदिपुरुष नावाच्या चित्रपटात सैफ रावणाची भूमिका साकारत आहेत.

यामध्ये सैफ अली खान म्हणत आहेत की ते रावणाच्या भूमिकेला हिरोप्रमाणे प्रस्तुत करतील. ते म्हणत आहेत की, लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापल्याने त्या बदल्याच्या भावनेतून रावणाने माँ सीतेचं हरण केलं, प्रभू रामचंद्रांबरोबर युद्ध केलं. या घटनेला ते न्याय देणार आहेत.

सैफ अली खान याचं समर्थन करत असतील, तर याचं समर्थन कसं होईल?’ हा सवाल उपस्थित करत राम कदम पुढे म्हणाले आहेत की, ‘प्रभू रामचंद्रांनी धर्म स्थापित केला, आमची आस्था आणि श्रद्धा आहे. राम आणि रावणाची लढाई ही धर्म आणि अधर्म यांच्यातील आहे. ते अधर्माला उचित सिद्ध करत आहेत. आमच्या आस्था आणि श्रद्धेशी कोणी खेळू शकत नाही.’

राम कदम यांनी यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला ‘तान्हाजी-द अनसंग वॉरियर’ या सिनेमाची देखील आठवण करून दिली. राम कदम म्हणाले की, ‘जे हा सिनेमा बनवत आहेत, ओम राऊतजी, त्यांनी याआधी तान्हाजी हा सिनेमा बनवला होता. त्यामध्ये ज्याप्रकारे हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील मराठ्यांची अस्मिता अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता त्याचप्रमाणे या सिनेमातही त्यांना हिंदूंच्या आस्था आणि श्रद्धेचा सन्मान त्यांना करावा लागेल.

हिंदू भावना दुखावल्या गेल्यास ते सहन केले जाणार नाही.’ चित्रपटासंदर्भात सैफ अली खानने केलेल्या एका वक्तव्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि सोशल मीडियावर #BoycottAdipurush ट्रेंड केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!