Share

‘दोन वेळा अँजिओप्लास्टी झाली, तरी राऊत साहेबांची वाणी विरोधकांच्या हृदयात धडकी भरवणारीच’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यावर काल (५ डिसेंबर) संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवारांनी ही भेट घेतल्याचे सांगितले आहे. यावेळी शरद पवारांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे यांसह दिग्गज नेते उपस्थित होते.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संजय राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल २०२० ही नियोजित वेळ होती. पण कोव्हिड प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. अखेर संजय राऊत यांच्यावर बुधवारी लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी दोन स्टेन त्यांच्या हृदयात टाकण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

या भेटीवेळी शरद पवारांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे यांसह दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. संजय राऊतांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या दिग्ग्ज नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी अनेक राजकीय विषयांवरही चर्चा करण्यात आल्याचे बोललं जात आहे.

या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत संजय राऊतांच्या लढाऊबाण्याचे कौतुक केले आहे. ‘शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खा. संजय राऊत यांची शरद पवार साहेब, अजितदादा यांच्यासमवेत भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. एका वर्षात दोन वेळा अँजिओप्लास्टी झाली, तरी राऊत साहेबांचे हृदय मजबूत आणि वाणी विरोधकांच्या हृदयात धडकी भरवणारीच आहे’! अस धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!