Share

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटातील ३८ बंडखोर आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढला, याचिकेत दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शनिवारी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. सर्व आमदारांना २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या नोटीसीनंतर आता एकनाथ शिंदे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकार विरोधात दोन याचिका दाखल केल्या आहेत. शिंदे गटाने केलेल्या पहिल्या याचिकेत बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेच्या कारवाईला आव्हान दिले आहे.

यानंतर दुसऱ्या याचिकेत विधानसभेत शिंदे यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही आमदाराला शिवसेना गटनेते पदी नियुक्ती किंवा प्रतोद बनविण्यावर आव्हान दिले आहे. यानंतर एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मात्र, त्याआधीच मोठी बातमी समोर आली आहे. बंडखोर 38 आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत सरकारचा पाठिंबा काढला असल्याचा दावा केला आहे.

तसेच विधानसभा उपाध्यक्ष यांचा चुकीचा वापर राज्य सरकार करत असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. येवडच नव्हे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनाही पत्र पाठवत सरकारचा पाठिंबा काढल्याचे सांगितले आहे. तसेच सरकारने बहुमत सिद्ध करावे अस आव्हान दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार समोर मोठा पेच निर्माण झाला आहे

दरम्यान, शिंदे यांनी काल दोन ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. शिंदे ट्विटमध्ये म्हणाले कि, आता मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.. असं ते ट्विटमध्ये म्हणाले. दुसऱ्या ट्विटमध्ये हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर….तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू… असं देखील शिंदे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!