मुंबई : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिला सामना जिंकला. डब्लिनमध्ये झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने आयर्लंडचा (IRE vs IND) ७ विकेट्सने पराभव केला. पावसामुळे हा सामना १२-१२ षटकांचा होता. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघाने १२ षटकात १०८ धावा केल्या. पण, एकेकाळी आयर्लंडचा संघ संघर्ष करताना दिसत होता. २२ धावांत त्यांनी ३ विकेट गमावल्या होत्या. पॉल स्टर्लिंग (४), कर्णधार अँडी बालबर्नी (०) आणि गॅरेथ डेलेनी ८ धावा जोडू शकले. अशा स्थितीत आयरिश संघ मोठी धावसंख्या करू शकणार नाही, असे वाटत होते. मात्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हॅरी टॅक्टरने ३३ चेंडूत नाबाद ६४ धावा करत आयर्लंडला १०८ धावांपर्यंत नेले. टॅक्टरने या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार मारले. हार्दिकने या आयरिश फलंदाजाला आपली बॅट भेट दिली.
या सामन्यानंतर खुद्द भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याही त्याच्यावर भारावला होता. हार्दिकने सांगितले, “त्याने काही चांगले शॉट्स खेळले. तो २२ वर्षांचा आहे, मी त्याला बॅट भेट दिली आहे, कदाचित तो येत्या सामन्यांमध्ये आणखी काही षटकार ठोकू शकेल. आशा आहे की तो आयरिश क्रिकेटला पुढे नेईल आणि कोणास ठाऊक आहे की आयपीएलचा करार देखील मिळू शकेल. हॅरीला माझ्या शुभेच्छा. फक्त, त्याला घड्याळाची काळजी घ्यावी लागेल आणि योग्य दिशेने कठोर परिश्रम करावे लागतील आणि असे करण्यात तो यशस्वी झाला तर तो केवळ आयपीएलमध्येच नाही तर इतर अनेक लीगमध्ये खेळेल.”
Harry Tector has impressed an IPL-winning captain ???? #IREvIND
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 27, 2022
हॅरी टॅक्टरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात जास्त वेळ घालवला नाही. पण, त्याला आधीच आयर्लंडचे भविष्य मानले जात आहे. त्याने आतापर्यंत ३३ टी-२० मध्ये ६०४ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १३३ आहे. त्याचबरोबर या फलंदाजाची वनडेतील कामगिरी चांगली झाली आहे. आतापर्यंत हेक्टरने २० एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि त्यापैकी ७ मध्ये त्याने अर्धशतके झळकावली आहेत. त्याने टी-२० मध्ये ३ अर्धशतके झळकावली आहेत आणि भारताविरुद्धची ६४ धावांची नाबाद खेळी ही त्याची टी-२० मधील सर्वोत्तम धावसंख्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

