Share

‘माझ्या बायोपिकमध्ये नीरज चोप्रा मुख्य भूमिकेत असावा’; अक्षय कुमारने व्यक्त केली इच्छा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ऑलिम्पिक स्पर्धेतील भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत धडक मारली होती. यासह नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची आशा लागली होती. त्याने भारतीयांची आशा पूर्ण केली. आणि शनिवारी नीरज अंतिम फेरी खेळला आणि त्याने भारताला सुवर्ण पदक मिळून दिले. पुरुष भालाफेक स्पर्धेत ८३.५० मीटरपर्यंत भाला फेकणाऱ्या किंवा यापेक्षा कमी कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम १२ खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो.

बुधवारी पार पडलेल्या अ गटाच्या पात्रता फेरीत नीरजने ८६.६५ मीटरपर्यंत भाला फेकत थेट अंतिम फेरीत धडक मारली. नीरजने ८३.५० पेक्षा अधिक लांब भाला फेकत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं होते. दरम्यान त्याने सर्वोत्तम थ्रो ८७.५८ मीटरचा केला. आणि भारताला तब्बल १३ वर्षानंतर सुर्वण पदक मिळाले. त्यमुळे नीरजवर सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्यानंतर सध्या नीरज चोप्राच्या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता असणार  याबाबत सोशल मिडियावर प्रचंड चर्चा आहे. मात्र स्वतः नीरजने त्याच्या बायोपिकसाठी कोणत्या अभिनेत्याला पाहायला आवडेल हे सांगितले.

यावर नीरज चोप्राने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया देत सांगितले की, ‘माझ्या बायोपिकमध्ये मला हरियाणाचा रणदीप हुड्डाला पाहायला आवडेल. बॉलिवूडमधून अक्षय कुमारही मला खूप आवडतो’, असं नीरज चोप्राने यावेळी सांगितले. त्यानंतर आता अक्षय कुमारने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत अक्षय म्हणाला की, ‘लोक चर्चा करत आहेत की मी आतापासूनच बायोपिकसाठी सराव करण्यास सुरुवात केली आहे. हे ऐकून मला हसू अनावर झाले होते.’ तर पुढे अक्षयने त्याच्या बायोपिकविषयी इच्छा व्यक्त करत म्हणाला की, ‘नीरज चोप्रा गूड लूकिंग आणि हॅण्डसम आहे. माझ्यावर एखादा बायोपिक आलाच तर नीरज चोप्रा मुख्य भूमिकेत असेल’ असे अक्षय म्हणाला.

दरम्यान, नीरजच्या यशानंतर अभिनेता अक्षय कुमारने ट्वीट करत लिहिले की, हे गोल्ड आहे. या ऐतिहासिक विजयासाठी मनापासून शुभेच्छा नीरज चोप्रा. तू त्या सर्व आनंदाच्या अश्रूसाठी जबाबदार आहे. शानदार, असे म्हणत नीरज चोप्राचे मनापासून कौतुक केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!