Share

Sadabhau Khot | विनायक मेटे यांचे निधन मनाला चटका लावणारे – सदाभाऊ खोत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा भीषण अपघात होऊन त्यांचे निधन झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानंतर विनायक मेटेंच्या निधनावर आता राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यातच रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीही विनायक मेटेंच्या कार्याला उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

“आजचा दिवस हा दुःख घेऊनच उगवला आहे. आमचे सहकारी विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं हि बातमी समजताच खऱ्या अर्थाने मनाला धक्का बसला. मेटे हे आयुष्यभर मराठा समाजासाठी लढत राहिले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका त्यांनी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही मांडली. तसेच हे काम करत असताना होय! मी मराठा समाजाचा नेता आहे, माझ्या मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, हि भूमिका त्यांनी राजकारणाच्या पटलावर आणि समाजाच्या पटलावरसुद्धा मांडण्याचं काम आयुष्यभर केलं. असा माणूस आज निघून गेल्यामुळे समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते सर्व घटक पक्षांचे नेते होते. सर्व टक पक्षांना एकत्रित ठेवण्याचं काम त्यांनी केलं होतं. ते केवळ मराठा समाजासाठी न लढता शेतकरी, शेत मजूर, बारा बलुतेदार यांच्यासाठीही ते लढले. त्यांच्या याच लढवय्या वृत्तीनुसारच त्यांनी शेवटचा श्वासही लढत लढतच घेतला. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी हि प्रार्थना मी परमेश्वरा चरणी व्यक्त करतो.” अशी दुःखद प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली.

अपघाताची शहानिशा करणार

त्यातच आता मेटेंचा अपघात झाला आहे कि, घातपात याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. मेटेंना लवकर ऍम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने मेटेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत अपघात झाल्यानंतर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात दिरंगाई झाली, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. यावेळी या संपूर्ण प्रकरणाची माहिती चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर संपूर्ण अपघात प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!