मुंबई : सध्या सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी ‘द टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल. आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून त्यांना या धमक्या येत आहेत. आणि यामुळे ते कोरोना लशीचे उत्पादन लंडन मध्ये करण्याच्या तयारीत आहेत, असं म्हटलं जात आहे.
यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘अदर पुनावाला यांनी लंडनधल्या ‘द टाईम्स’ला मुलाखत दिली आहे. त्यामुळे खरं-खोटं तपासण्याची गरज आहे. भारतात कोरोना प्रतिबंधक लसींच उत्पादन करणारा अदर पुनावाला लंडनला का निघून गेला? ते भारतातल्या प्रत्येक नागरीकाला कळायलाच हवं. ज्या अर्थी तो म्हणतोय की, शीर कापलं जाईल, त्या अर्थी प्रकरण गंभीर आहे, याचा शोध घेतला पाहिजे’ असे आव्हाड म्हणाले.
सिरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेलेत अशी बातमी आहे . द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत,आणि सत्य बोललो तर शीर कापले जाईल. NDTV चे पत्रकार रविष कुमार यांनी सुध्दा या संदर्भात पोस्ट केली आहे …देशाला हे कळायला हव#खरे_की_खोटे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 1, 2021
या राज्यातला मंत्रालयातला शिपाई का असेना, त्याला जगण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याचा तो मुलभूत अधिकार आहे. त्यावर कोणी गदा आणत असेल, तर योग्य कारवाई होईल. आजच्या घडीला भारतातला सर्वात महत्त्वाचा व्यक्ती कोण असेल, तर तो अदर पूनावाला आहे. कोट्यवधी लोकांचे जीव त्याच्या हातात आहेत. तो लसींचे उत्पादन पुण्यातून लंडनला हलवणार असेल तरी ती नामुष्की आहे’ असे जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘विदेशात लस दिल्याने आपल्याकडे कमतरता’, अजित पवारांचा मोदी सरकारवर निशाणा
- एकनाथ खडसेंनंतर आता गुलाबराव पाटलांनी गिरीश महाजनांना डिवचले, म्हणाले..
- ‘..मग इतक्या दिवस तुम्ही काय केले?’, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे भुलभुलय्या’, भाजपचा टोला
- ‘पाणी डोक्यावरून गेलेय, तत्काळ ऑक्सिजन द्या’, हायकोर्टाने मोदी सरकारला झापले


