Share

‘एनडीआरएफची मदत प्रातिनिधीक, पण तुमची मदत तुम्ही केली पाहिजे’, चंद्रकांत पाटलांचा सल्ला

Published On: 

कोल्हापूर : मला सकाळपासून शेतकऱ्यांचे फोन येताहेत, केवळ १४०० रुपये मदत जमा झाल्याचे ते सांगत आहेत. ठाकरे सरकार यावर सकारात्मक भूमिका घेणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे. त्यांना केवळ केंद्राकडे बोट दाखवणं येतं. ते स्वत: भूमिका घेणार नाहीत. आज मला काही शेतकऱ्यांचे सकाळपासून फोन येत आहेत. केवळ १४०० रुपये जमा झाले आहेत. असे चंद्रकांत पाटील म्हणाले, ते कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी केंद्राची वाट न पाहता ९६०० कोटी दिले होते. केंद्राने १८०० कोटींची मदत दिली होती. ही एनडीआरएफची मदत सर्व देशसााठीची आहे. ती प्रातिनिधीक आहे. तुमची मदत तुम्ही केली पाहिजे असं केंद्राने स्पष्ट केलं होतं. आम्ही ९६०० कोटीचा प्रस्ताव दिला मात्र १८०० कोटी मिळाले होते. बाकीचे आम्ही महाराष्ट्राच्या तिजोरीतून काढले. यांनी केंद्राकडे बोट दाखवून शेतकऱ्यांना केवळ १४०० रुपये दिले.

मला सिन्नरमधून शेतकऱ्यांचा फोन आला. १४०० रुपये मिळाल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलं. या शेतकऱ्याकडे अडीच हेक्टर जमीन आहे. मात्र, सर्वांना याच रेंजमध्ये पैसे आले आहेत. या सरकारची इच्छा शक्ती नाही. समन्वय नाही. १५ दिवस पीकं पाण्याखाली असताना पंचनामे कसे करता. देवेंद्र फडणवीसांनी पंचनामे न करता निधी दिला, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!