औरंगाबाद : घराचे कुलूप तोडून जर्मनच्या डब्यात ठेवलेले रोख २ लाख ७८ हजार रुपये,१५ हजार रुपये किंमतीची भांडी आणि चार हजार रुपये किंमतीचे पाच सोन्याचे मनी असा सुमारे २ लाख ८० हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरणार्याला सिटीचौक पोलिसांनी सोमवारी (दि. २९) पहाटे अटक केली. त्याला एक एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. कांबळे यांनी दिले.
सागर राजविर बिडलॉन (१९ रा. हर्षनगर, लेबर कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. लेबर कॉलनीत राहणारे सईदा अन्वर शेख (५८, रा. लेबर कॉलनी) यांचे वडीलोपार्जीत घर जिर्ण झाल्याने सईदा यांनी घराचे नवीन बांधकाम करण्याचे ठरविले. त्यासाठी सईदा या परिसरातील शरिफ यांच्या घरी किरायाने राहण्यासाठी गेल्या. गेल्या आठ दिवसांपासून सईदा या जुन्या घरातून थोडे थोडे सामान किरायाच्या घरात आणुन ठेवत होत्या.
जुन्या घरातील पितळे भांडे व प्लॉट विक्री करुन आलेले पावने तीन लाख रुपये जुन्या घरातील एका जर्मनच्या डब्यात ठेवले होते. २७ मार्च रोजी सकाळी सात वाजता सईदा यांच्या मुलीला जुन्या घरा शेजारी राहणार्या एका महिलेने याने फोन करुन जुन्या घराचा दरावाजा उघडा असल्याचे सांगितले. त्यानंतर सईदा या जुन्या घरी गेल्या असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने आरोपीला अटक केली. त्याने साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीला आज न्यायालयात हजर केले. सहायक सरकारी वकील एन.ए. ताडेवाड यांनी बाजू मांडली.
महत्त्वाच्या बातम्या
- बंगाल निवडणुकीत पाठींब्यासाठी ममता बॅनर्जींचे देशातील ‘या’ नेत्यांना पत्रं
- कोरोनात सेवा बजावतांना मृत पावलेल्या अंगणवाडी सेविकेच्या वारसांना मिळाली मदत
- महाराष्ट्र सरकार वाघांचं की लांडग्यांचं? आंबेडकरांचा प्रहार
- ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्यासाठी काही दिवसांनी शरद पवार जाणार बंगालला
- देर आये दुरुस्त आये! कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी अखेर मनपाने नियुक्त केली पथके


