🕒 1 min read
कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे.
भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे.
पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत प्रमुख विरोधी पक्षांच्या १५ नेत्यांना पत्रं लिहून हे आवाहन केलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी, शरद पवार, डीएमकेचे एमके स्टॅलिन, सपा नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल, आंध्रचे मुख्यमंत्री जनग रेड्डी, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक, वाय. एस. रेड्डी, माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती आणि दीपांकर भट्टाचार्य यांना ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहून मोदी विरोधातील लढाईत पाठबळ देण्याचं आवाहन केलं आहे.
भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात सर्वांनी संयुक्तपणे राष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी या पत्रातून केलं आहे. दरम्यान तृणमूल कॉंग्रेस-भाजपामध्ये मुख्य लढत असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात ३० जागांसाठी मतदान झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र सरकार वाघांचं की लांडग्यांचं? आंबेडकरांचा प्रहार
- जळगावमधील मानहानीकारक पराभवानंतर ‘त्या’ नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी 30 हजार पानांची याचिका
- रवी शास्त्रींनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट, चर्चांना उधाण
- चौकशी समितीवरून आव्हाड-फडणवीसांमध्ये जुंपली; फडणवीसांनी थेट ‘तो’ कागदचं दाखवला
- एक माजी मुख्यमंत्री व एक माजी पोलीस आयुक्त, त्यांना FIR प्रोसिजर माहीत नव्हती? राष्ट्रवादीची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

