Share

महाराष्ट्र सरकार वाघांचं की लांडग्यांचं? आंबेडकरांचा प्रहार

Published On: 

🕒 1 min read

अकोला : काही दिवसांपूर्वी मेळघाटच्या हरिसाल येथील वनक्षेत्राच्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यांचे वरिष्ठ सहकारी विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आपले जीवन संपविले होते. यापार्श्वभुमीवर मेळघाट वनक्षेत्राचे माजी प्रादेशिक संचालक एमएस रेड्डी यांना शासनाने निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे.

दीपाली चव्हाण यांनी मृत्यूआधी एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी विनोद शिवकुमार याच्या काळ्या कारवायांबाबत लिहून ठेवले आहे. त्यांनी अनेकदा मेळघाट वनक्षेत्राचे प्रादेशिक संचालक एमएस रेड्डी यांच्याकडे तक्रार करूनही त्यांनी कारवाई केली नाही असेही या पत्रात लिहिले होते. यानंतर आता रेड्डी यांच्यावर राज्य सरकारने कारवाई केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या मुळाशी मेळघाट आणि धारणी क्षेत्रातील वाघ आणि सागवान तस्कर असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच, यासंदर्भात आठवड्याभरात सरकारनं ठोस कारवाई करावी अन्यथा पुरावे सार्वजनिक करण्याचा इशाराही दिला आहे. यासोबतच, मेळघाटात काम करणाऱ्या एनजीओची, कायद्याने बंदी असलेल्या आदिवासींच्या जमिनीची विक्री या प्रकरणांची चौकशी होऊन नुकतंच निलंबन झालेल्या रेड्डी यांच्यावर गुन्ह्याला प्रोत्साहित केल्याचा गुन्हा देखील दाखल करावा अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे.

आंबेडकरांनी याच प्रकरणावरून ठाकरे सरकारवर देखील बोचरी टीका केली आहे. ‘स्वत:ला वाघ समजणाऱ्या शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता असलेल्या सरकारच्या काळातही वाघ तस्करांच्या कारवाया सुरूच असल्याने ‘हे सरकार वाघांचं की लांडग्यांचं?” असा सवाल करत प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी व शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!