Share

देर आये दुरुस्त आये! कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी अखेर मनपाने नियुक्त केली पथके

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरात दररोज हजारांहून अधिक रुग्णसंख्या निघत आहे. जास्तीत जास्त चाचण्या केल्या जात आहेत त्यामुळेच रुग्णसंख्येचे प्रमाणही वाढत आहे. पालिका प्रशासनाने चिकलठाणा एमआयडीसी व रेल्वेस्टेशन एमआयडीसीमध्ये स्वतंत्र पथके नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच नऊ प्रभागांमध्ये नऊ पथके देखील नियुक्त केली आहेत. शासन निर्देशांनुसार चाचण्यांवर भर तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी भर दिला जाणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.

राज्य सरकारने कोरोना संसर्गाबाबत जारी केलेल्या निर्देशानुसार जास्तीत जास्त चाचण्या मनपाने सुरु केल्या आहेत. त्यानुसार जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे व कोरोनाबाधितांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्ती शोधून काढण्यासाठी पालिकेने मोहिमेला गती दिली आहे. त्यासाठी अँटिजेन आणि आरटीपीसीआर पध्दतीने कोरोना चाचणी करण्यासाठी पालिकेने ३६ पथकांची स्थापना केली आहे.

त्यात आणखीन वाढ करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. पालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांनी याबाबत सांगितले की, औद्योगिक वसाहतीमधील कामगारांची कोरोना चाचणी करण्यासाठी चिकलठाणा औद्योगिक वसाहत व रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीसाठी प्रत्येक एक-एक पथकाची नियुक्ती केली आहे.

ही पथके कोरोना चाचणीसह ट्रेसिंगचे काम देखील करणार आहेत. पालिकेच्या क्षेत्रात नऊ झोन कार्यालये आहेत. नऊ प्रभाग कार्यालयांसाठी नऊ पथके देखील नियुक्त केली जाणार आहे. ही पथके त्या त्या प्रभाग कार्यालयातील आरोग्य अधिकार्‍यांच्या अधिपत्याखाली काम करतील. आरोग्य अधिकार्‍याला प्रभागांमधील ज्या भागात रुग्णांची संख्या जास्त आहे, असे वाटेल किंवा ज्या भागात चाचण्यांचे प्रमाण वाढवावे असे वाटेल, त्या भागात पथकाला पाठवले जाणार आहे. त्यामुळे बाधितांच्या संपर्कतील व्यक्ती लवकर लक्षात येतील, असेही डॉ. राठोडकर यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!