Share

कोरोनात सेवा बजावतांना मृत पावलेल्या अंगणवाडी सेविकेच्या वारसांना मिळाली मदत

Published On: 

🕒 1 min read

पैठण : कोरोना काळात कोरोना विषयक कामे केलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने कोरोना विमा कवच अंतर्गत विमा संरक्षण दिले होते. कोरोनाने मृत्यू झाल्यास ५० लक्ष रुपयांचा विमा एकात्मिक बाल विकास विभागाने काढला होता. दरम्यान पैठण तालुक्यातील लोहगाव येथील अंगणवाडी कार्यकर्त्या महिलेला विम्याची रक्कम नुकतीच मिळाली आहे.

कल्पना सुभाष मांडे यांचे ऑक्टोबर २०२० मध्ये कोरोनाने निधन झाले होते. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी सुनिल अंकुश यांनी महिला बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद औरंगाबादचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या सूचनेनुसार विम्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यास नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार ५० लक्ष रुपये इतका निधी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयास प्राप्त झाला.

प्रस्ताव मंजुरीसाठी रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे व महिला बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण व मिरकले यांनी पाठपुरावा केला. सदर रकमेचा धनादेश संदीपान भुमरे यांच्या हस्ते कल्पना मांडे यांचे पती सुभाष मांडे यांना सुपूर्द करण्यात आला. या वेळी भुमरे म्हणाले की, मृत्यू होणे ही घटना वाईटच आहे अशी वेळ कुणावर येऊ नये,

मांडे कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे कठीण परिस्थितीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागे शासन खंबीर पणे उभे आहे असे सांगितले. जिल्ह्यात आणि राज्यामध्ये अशा स्वरूपाचा विमा दावा मंजूर होण्याची ही पहिलीच केस आहे. कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन भुमरे कॅबिनेट मंत्री यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!