🕒 1 min read
मुंबई : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे.
भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे.
सद्या, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे (TMC) सरकार आहे. आता, बंगालच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. दरम्यान, शिवसेनेने ममता बॅनर्जी यांना पाठींबा देऊन भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.
आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील बंगाल निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांना पाठींबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १ एप्रिलपासून ३ एप्रिलपर्यंत बंगाल दौर्यावर जाणार होते. परंतु प्रकृती अस्वस्थेमुळे त्यांनी हा दौरा पुढे ढकलला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली आहे.
प. बंगालच्या मुख्यमंत्री @MamataOfficial यांनी देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्रं लिहून समर्थन मागितले आहे. आदरणीय खा. @PawarSpeaks यांनाही हे पत्र प्राप्त झाले आहे. ममता बॅनर्जी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे – @nawabmalikncp pic.twitter.com/ZmXNqw4B0V
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 31, 2021
ममता बॅनर्जी यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पाठिंब्यासाठी पाठवलेले पत्र प्राप्त झाले असून आमच्या पक्षाचा ममताजींना पाठिंबा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देर आये दुरुस्त आये! कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी अखेर मनपाने नियुक्त केली पथके
- महाराष्ट्राचे माजी मंत्री महादेव जानकर यांना मातृशोक
- कोरोना प्रतिबंधासाठी दररोज १० हजार चाचण्या
- एक माजी मुख्यमंत्री व एक माजी पोलीस आयुक्त, त्यांना FIR प्रोसिजर माहीत नव्हती? राष्ट्रवादीची टीका
- पुणे महापालिकेचे ‘कोरोना कॉल सेंटर’ आता २४ तास उपलब्ध राहणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

