दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामन्यात पाकिस्तानने भारताचा दारूण पराभव केला. मात्र आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेचा अंतिम सामना व्हावा, अशी इच्छा पाकिस्तानचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान रविवारी झालेल्या लढतीत पाकिस्तानने भारतावर १० गडी राखून मोठा विजय प्राप्त केला होता. तसेच त्या सामन्यातून दोन्ही संघांद्वारे मानवतेचा संदेश दिला गेल्याचे मतही सकलेन यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने भारताला पराभूत केले असले तरी भारताचा संघ मजबूत आहे. विश्वविजेतेपदाच्या दावेदारांपैकीही भारताला गणले जात आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान अंतिम सामना झाला तर उत्तमच होईल’ अशी इच्छा सकलेन मुश्ताक यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान आज सायंकाळी ७ वाजता पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना होणार आहे. तसेच वेस्ट इंडीज आणि बांगलादेश असा सामना रंगणार आहे. या दोन्ही संघांना आज स्पर्धेत स्थान टिकविण्यासाठी विजय अनिवार्य आहे. त्यामुळे आजचा सामना चांगलाच रंगणार असल्याचे चिन्ह आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आर्यनच्या जामिनावर नवाब मलिकांची सुचक प्रतिक्रिया, ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’
- खळबळ! ‘ती’ संवेदनशील माहिती फडणवीसांनी नव्हे तर मलिक व आव्हाडांनीच उघड केली; रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा
- महिलेची १८ लाखांची फसवणूक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक
- ‘मन्नत’ पूर्ण झाली! अखेर आर्यन खानला जामीन मंजूर, मुंबई हायकोर्टाचा निर्णय
- हायकोर्टाकडून समीर वानखेडेंना दिलासा, अटक करण्यापूर्वी तीन दिवस अगोदर नोटीस द्यावी लागणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

