Share

अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी

Published On: 

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखाना तसेच निकटवर्तीयांच्या मालत्तमत्तांवर छापे टाकले होते. आता ईडीने अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या पुण्यातील सिंध सोसायटीमधील घरी धाड टाकली आहे.

पुण्यातील सिंध कॉलनीत कदम यांचे घर असून ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी सकाळीच त्यांच्या घरी छापेमारीसाठी दाखल झाले. दौंड साखर कारखान्यावर यापूर्वी ७ ऑक्टोबर रोजी आयकर विभागाचा छापा पडला होता. यापूर्वी अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींचे दौंड शुगर, अंबालिका, शुगर, जरंडेश्वर साखर कारखाना, पुष्पदनेश्वर शुगर व नंदुरबार खासगी साखर कारखान्यांवरही आयकर विभागाने कारवाई केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांत आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप केलेला आहे.

राज्य सहकारी बँकेने त्यांचे अध्यक्ष, संचालक, उच्चाधिकारी व काही राजकीय नेत्यांच्या प्रभावाखाली अनेक सूतगिरण्या, सहकारी साखर कारखाने यांना असुरक्षित व भरमसाठ कर्ज वाटप केले. या कर्जवाटपादरम्यान मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन झाले. ही सर्व कर्जे पुढे बुडित खात्यात गेल्याने बँकेचे व परिणामी सरकारी तिजोरीचे नुकसान झाले. हा संपूर्ण घोटाळा २५ हजार कोटी रुपयांचा असून त्याचा ‘ईडी’ कडून तपास सुरू आहे. याच तपासांतर्गत गुरुवारी हा छापा टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अजित पवार यांचे बंधू जगदीश कदम हे दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीनेही राज्य सहकारी बँकेचे कर्ज बुडवले आहे. त्यामुळेच कदम यांच्याशी संबंधित मुंबईतील कार्यालय, पुण्यातील घरांवर हा छापा टाकण्यात आला. एकूण सात ठिकाणांचा यांत समावेश होता. त्याशिवाय नागपुरातही एका कार्यालयाचा तपास व छाप्यात समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!