टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याची कबुली दिली आहे. याविषयी बोलताना त्यांनी होय, माझी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचं आमंत्रण मला दिलं आहे. मात्र याविषयी कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहे अशी माहिती दिली आहे.
दरम्यान, भास्कर जाधव यांनी शिवसेनेत घरवापसी करण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीला कोकणात मोठा धक्का बसणार आहे. कारण भास्कर जाधव हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते तसेच त्यांनी आघाडी सरकारच्या काळात अनेक महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा अजून एक धक्का आहे.
आज राष्ट्रवादी कॉंग्रेसला अजून एक धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते बार्शीचे आमदार होते. प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सोपल यांच्या जाण्याने सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अडचणी अजूनचं वाढल्या आहेत.
- आता हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत नाही- देवेंद्र फडणवीस
- ‘शरद पवारांना सोडण्याचा गम नाही पण…’
- आर्थिक मंदीबाबत राज ठाकरेंचं भाकीत ठरलं खर !
- उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला पेपर मी सध्या फोडणार नाही : आदित्य ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

