औरंगाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या कणखर नेतृत्वामुळे आज आपल्या देशावर हल्ला करण्याची आणि वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिमंत नाही. हल्ला केला की आता सर्जिक स्ट्राईक आणि बालाकोट होतो हे त्यांना कळून चुकले आहे. सत्तर वर्षापासून प्रत्येक देशवासियांच्या मनात असलेले 370 कलमाचे शल्य मोदींजींनी ते हटवून एका बलशाली राष्ट्राची ओळख जगाला करून दिली आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
औरंगाबाद येथील महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या कश्मिरातील कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचे समर्थन करतांना या निर्णयामुळे जगाच्या पाठीवर भारताकडे अभिमानाने पाहिले जात असल्याचे सांगितले.
फडणवीस म्हणाले, पंधरा ऑगस्टला देशभरात तिरंगा फडकवला गेला, मी मुंबईत तर मोदीजींनी लाल किल्यावर तिरंगा फडकवला. यावेळी तिरंग्याचा नूर ,डौल आणि स्वाभीमान काही निराळाच होता. कारण एक देश एक ध्वज ही संकल्पना खऱ्या अर्थाने पुर्ण झाली होती. संपुर्ण देशात तिंरगा फडकत असतांना तिकडे कश्मिरात देखील भारताचा तिंरगा मोठ्या दिमाखात फडकवला जात होता. गेली सत्तर वर्ष देशातील लोक या क्षणाची वाट पाहात होते. आता खऱ्या अर्थाने या भागाचा सर्वांगीण विकास होईल.
कश्मिरातील कलम 370 हटवण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने घेतला आणि भारत हे एक बलशाली राष्ट्र आहे हे जगाला दाखवून दिले. देश बलशाली झाला तसाच महाराष्ट्र देखील आपल्याला बलशाली करायचा आहे, आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचा जनादेश मिळवण्यासाठी मी फिरतो आहे असे म्हणत फडणवीस यांनी उपस्थितांना महायुतीच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

