Share

आर्थिक मंदीबाबत राज ठाकरेंचं भाकीत ठरलं खर !

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : देशात सध्या आर्थिक मंदी आहे. या मंदीमुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. तर लाखो तरुण अजूनही रोजगाराच्या शोधात आहेत. अशी सगळी विदारक आर्थिक परिस्थिती असताना RBIने केंद्र सरकारला 1 लाख 76 हजार कोटी रूपये दिले आहेत. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला म्हणजेच मोदी सरकारला लक्ष केले आहे. हे सरकारचे अपयश असल्याची टीका केली जात आहे. तर मनसेनेही सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर ट्विट केले आहे.

नोटबंदी आणि जीएसटीमुळे पार विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला रिझर्व्ह बँकेच्या ‘रिझर्व्ह’चं ठिगळ लागणार, असे ट्विट करत राज ठाकरेंच्या 9 ऑगस्टच्या भाषणाची क्लीप टाकली आहे. या क्लीप मध्ये आरबीआयकडून पैसे घेऊन देश चालविण्याची वेळ येणार असल्याचं भाकीत राज ठाकरे यांनी त्यावेळी केलं होत.

त्या वेळी राज ठाकरे म्हणाले होते की, आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे पैसे रिझर्व्ह ठेवले जातात. कोणत्या बँकेने तुमचे पैसे बुडविले तर त्यासाठी हमी म्हणून रिझर्व्ह बँक असते. हा लोकांचा पैसा असतो. जर त्याच रिझर्व्ह बँकेतून सरकार पैसा काढणार असेल तर उद्या बँका डबघाईला आल्या तर तुम्हाला कोण पैसे देणार? असे म्हणत ठाकरे यांनी सरकारला सवाल केला होता.

दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रुपये देणार आहे. देशातील आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.रिझर्व्ह बँकेकडे असणाऱ्या अतिरिक्त रकमेतून सरकारने पैसे मागितले होते. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने विमल जालान यांच्या समितीच्या शिफारसी मंजूर केल्यात. त्यानुसार रिझर्व्ह बँक सरकारला १ लाख ७६ हजार कोटी देणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!