Share

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला राष्ट्रवादीच्या हेमा पिंपळे यांनी चपलेने झोडपले

Published On: 

बीड : बीड जिल्ह्यातील साखरे बोरगाव येथे अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. एका अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करताना ग्रामस्थांनी त्या नराधमाला रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. बीड शहरातील विक्रम पवार (वय २४) हा साखरेबोरगाव येथे आपल्या नातेवाईकाकडे गेला होता. याची नजर आपल्या शेजारी असलेल्या एका अकरा वर्षाच्या मुलीवर गेली. या नराधमाने अल्पवयीन मुलीला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एका शेतामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी आरोपीविरूद्ध नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बुधवारी आरोपी विक्रम पवार यास न्यायालयामध्ये घेवून जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा अॅड. हेमा पिंपळे यांनी आरोपीला चपलाने मारले. मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने आरोपी बेदम मार खाण्यापासून वाचला. अत्याचार करणाऱ्या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच आरोपीने आणखी कोणत्या मुलीवर अत्याचार केले आहेत का याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. यापुढे जर अशा प्रकारच्या घटना घडल्या तर नराधमांना जागेवर चोप देणार असा इशारा हेमा पिंपळे यांनी दिला आहे.

बीड जिल्ह्यात महिला अत्याचारात वाढ
दरम्यान, बीड जिल्ह्यात गेल्या सात महिन्याच्या कालखंडात महिला अत्याचाराचे तब्बल ६३८ गुन्हे नोंद झाले असून ८५ महिला-मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पुर्णत: ढासळल्याचे समोर येत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांच्या हप्तेखोर भूमिकेमुळे गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी गुन्ह्यांचा आलेख वाढला असून मागच्या वर्षीच्या तुलनेत २४८ गुन्हे वाढल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

कौटुंबिक हिंसाचारात २४४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुलींना पळवून नेणे हे ५९ गुन्हे दाखल असून छेडछाडीचे आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार ३ गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२१ च्या आठव्या महिन्यातच २४८ गुन्हे वाढले असल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!