🕒 1 min read
पुणे : पुण्यामधील औंध येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर हटवण्यात आले आहे. रात्री या मंदिरामधून मूर्ती हटवण्यात आलीय. मात्र आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या नावाची आरती म्हणून मोदींचं मंदिर उभारण्याच्या या कृत्याचा निषेध केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप यांनी भाजपावर कठोर शब्दात टीका केली.
तर रात्रीपासून मूर्ती गायब झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देवच चोरीला गेल्याने आम्ही कुणाला साकडे घालायचे? आता आपल्या देशापुढील समस्या कोण दूर करणार ?, यापुढे पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाल्यावर आम्ही कोणाला साकडे घालायचे ? आमच्या नवसाला कोण पावणार ? असा सवाल उपस्थित करत पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. तर मूर्ती चोरीप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली जाणार आहे. आता तरी देव आम्हाला पावणार का? महागाई कमी करणार का? म्हणत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
https://www.facebook.com/JagtapSpeaks/videos/520320702410319/
‘मोदी नावाच्या या देवाला पेट्रोल, गॅस, डिझेल हा नैवद्य आवडतो, तो सुद्धा आम्ही घेऊन आलेलो. १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यापासून २०१४ पर्यंत या नैवद्याचे दर मर्यादित होते. मात्र या देवाला हे खाद्य इतकं आवडतं की त्याने याचे दर वाढवून ठेवलेत. हा नैवद्य दाखवण्याआधीच देव चोरीला गेला. देव रुसून गेलाय. या पुणे शहराचे प्रश्न सोडवण्याची ताकद या देवात नाहीय’, असेही जगताप म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोर्टाने ठाकरे सरकारची पळवाट बंद केली, सीबीआय लवकरच मंत्रालयाची पायरी चढणार’; भाजपचा टोला
- धक्कादायक! नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
- ‘आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार, मग ते राज ठाकरे असो वा कोणीही’
- धक्कादायक : भारतात कोविशील्डच्या बनावट लसी; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
- भाजपला ‘जन आशीर्वाद’ महागात पडला; कल्याण डोंबिवलीत 4 गुन्हे दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

