मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज दि. १९ ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होत आहे. या यात्रेदरम्यान राणे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. मात्र, या कार्यक्रमापूर्वीच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दादादरमधील शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाला राणेंना भेट देऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. यामुळे राणे आणि शिवसेना असा वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करण्याला विरोध केल्याने भाजपच्या वतीने शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे. ‘छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली ते शिवसेनेला आता सहन होत आहे. मग नारायण राणे यांनाच विरोध का असा सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विचारला आहे.
मा बाळासाहेबांनी टीका केली त्याकॅाग्रेसच्या वळचणीला सत्तेसाठी बसतां येत@ChhaganCBhujbal यांनी बाळासाहेबांना अटक केली, वाईटशब्द वापरले ते आता गोड, शिवसेनासोडणारे भास्करजाधव चालतातपण बाळासाहेबांनावंदन करायला @MeNarayanRane यांना विरोध. मा बाळासाहेब मोठे नेते त्यांनासंकुचित करू नका
— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 19, 2021
‘माननीय बाळासाहेबांनी टीका केली त्या काँग्रेसच्या वळचणीला सत्तेसाठी बसता येते. छगन भूजबळ यांनी बाळासाहेबांना अटक केली, वाईट शब्द वापरले ते आता गोड झाले. शिवसेना सोडणारे भास्कर जाधव चालतात. पण बाळासाहेबांना वंदन करायला नारायण राणे यांना विरोध. दिवंगत बाळासाहेब ठाकरे मोठे नेते आहेत. त्यांना संकुचित करू नका’ असे म्हणत भाजपने शिवसेनेला सुनावले आहे.
‘आज बाळासाहेबांनी नारायण राणेंचे कौतूकच केले असते’
त्यापूर्वी पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर म्हणाले होती की, विरोध करायचा की नाही हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे. आमच्या दौऱ्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करणे हा कार्यक्रम असून तो आम्ही शांतपणे पार पाडणार आहोत. राणे साहेबांची राजकीय कारकीर्द बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली घडली असल्याचे जनतेने पाहिले आहे. त्यांच्या हाताखाली तयार झालेला कार्यकर्ता आज केंद्रात मंत्री आहे. आज जर बाळासाहेब हयात असते तर हे पाहून त्यांनाही नक्कीच आनंद झाला असता. त्यांनी त्यांचे मनापासून कौतुकही केले असते. त्यामुळे छोट्या मनोवृत्तीचे नेते अशा थोर नेतृत्वाचे दर्शन घेत असताना विरोध करू शकत नाहीत, असेही दरेकर यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- अफगाणचे राष्ट्रपती पळून गेल्यानंतरही तालिबान्यांविरोधात लढली ही महिला; आता तालिबान्यांनी…
- ‘तेव्हा जे शरद पवार तलाक बद्दल म्हणाले होते, तेच तालिबानी शरियाबद्दल सांगतायत’
- ‘आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार, मग ते राज ठाकरे असो वा कोणीही’
- धक्कादायक : भारतात कोविशील्डच्या बनावट लसी; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
- भाजपला ‘जन आशीर्वाद’ महागात पडला; कल्याण डोंबिवलीत 4 गुन्हे दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

