Share

मोदींची मूर्ती हटवली! ‘आता समस्या कोण दूर करणार, नवसाला कोण पावणार?’ राष्ट्रवादीचा आंदोलनाद्वारे सवाल

Published On: 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते संपूर्ण जगभरात आहेत. जगातील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या मोदींच्या चाहत्यांना त्यांचे विरोधक भक्त म्हणून चिडवतात. पुण्यात तर अशाच एका मोदी भक्ताने पंतप्रधान मोदींना चक्क देवाचा दर्जा देऊन त्यांचे मंदिरच उभारले होते. या मंदिराची अवघ्या देशभरात चर्चा झाली. मात्र, आता हे मंदिर पंतप्रधान कार्यालयाकडून कानपिचक्या मिळाल्यानंतर रातोरात हटवण्यात आले आहे. हा पुतळा आता शेजारच्या नगरसेवकाच्या कार्यालयात हलवण्यात आला आहे.

दरम्यान, रात्रीपासून मूर्ती गायब झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने उपहासात्मक आंदोलन केले आहे. ‘देवच चोरीला गेल्याने आम्ही कुणाला साकडे घालायचे? आता आपल्या देशापुढील समस्या कोण दूर करणार?, यापुढे पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाल्यावर आम्ही कोणाला साकडे घालायचे? आमच्या नवसाला कोण पावणार? असा सवाल उपस्थित करत पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. तर मूर्ती चोरीप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली जाणार आहे. आता तरी देव आम्हाला पावणार का? महागाई कमी करणार का? असे म्हणत राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले.

https://www.facebook.com/JagtapSpeaks/videos/520320702410319/

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने औंध गावात मयूर मुंडे आणि कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव म्हणून मोदींचे मंदिर बांधले होते. नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकजण येथे येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत होते. या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आला होता. राम मंदिर उभारणीची प्रेरणा घेत मोदी मंदिराची उभारणी करण्यात आल्याचा दावा मोदी समर्थकांकडून करण्यात आला होता. पुण्याच्या ओंध येथे राहणाऱ्या मयूर मुंढे यांनी पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांच्याकडून खास जयपूर येथून मोदींची २ फुटांची १ लाख ६० हजार रुपयांची मूर्ती तयार करुन घेतली. मात्र, आता ही मूर्ती हटवण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!