मुंबई : मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी थोड्या वेळापूर्वी जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळी देखील नारायण राणेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
मुंबईत आगमन होताच राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी पहिल्यांदाच तब्बल दीड महिना मुंबईपासून लांब राहिलो. देवेंद्र फडणवीस यांनी मला दिल्लीला पाठवले. ते मला कंटाळले होते की काय माहीत नाही’ अशी मिश्किल टिप्पणी राणे यांनी केली. केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी, अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी असल्याचे राणे यांनी सांगितले.
तसेच ‘राज्य सरकारला जनता कंटाळली आहे. उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उद्ध्वस्त करायला निघालेत असा घणाघात राणेंनी केला. ‘गर्दी कमी करण्याच्या मताशी मी सहमत नाही. गर्दी जरूर करा, पण कोरोनाचे नियम पाळून करा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. राणेंची जन आशीर्वाद यात्रा मुंबई, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत होणार आहे.
तर दुसरीकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी पर्वा करणार नाही, पण राणेंना बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा खा विनायक राऊत यांनी घेतला आहे. नारायण राणेंनी बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाण्याचा आगाऊपणा केल्यास शिवसैनिक त्यांना तिथून हाकलून लावतील असा इशारा त्यांनी दिला आहे. तर राणे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी भेट देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाळासाहेबांचे विचार एखाद्या कंपनीची शेअर्स इक्विटी नाही, त्यांचं दर्शन कुणीही घेऊ शकते’.
- ‘तेव्हा जे शरद पवार तलाक बद्दल म्हणाले होते, तेच तालिबानी शरियाबद्दल सांगतायत’
- ‘आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार, मग ते राज ठाकरे असो वा कोणीही’
- धक्कादायक : भारतात कोविशील्डच्या बनावट लसी; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
- भाजपला ‘जन आशीर्वाद’ महागात पडला; कल्याण डोंबिवलीत 4 गुन्हे दाखल

