मुंबई – फडणवीसांनी कायमस्वरूपी घरी बसवलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांची मर्जी राखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारवर बेताल वक्तव्य केले आहे परंतु बावनकुळे यांनी याबाबतचे पुरावे द्यावे अन्यथा सरकारची जाहीर माफी मागावी असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे.
माजी मंत्री बावनकुळे यांनी सरकारमध्ये सर्वप्रकारचे अवैध धंदे सुरू आहे. त्यासाठी जिल्हे वाटून घेतल्याचा आरोप केला असून या आरोपाला महेश तपासे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सत्ता गेल्यानंतर आणि स्वतःला व पत्नीला तिकीट न मिळाल्यामुळे मानसिक संतुलन गमावलेल्या अवस्थेत बावनकुळे असावे? म्हणून ते अशी वक्तव्य करत असल्याचे महेश तपासे म्हणाले.
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत असा गंभीर आरोप भाजपाचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकाआघाडीच्या मंत्र्यांवर केला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून वाळूचोरी, तस्करी या प्रकारचे धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत. असा धक्कादाय आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
तर, रेती वाहतूक करणाऱ्या गाड्या अ़डवायच्या नाहीत, असा एसपी आणि कलेक्टरांना अलिखित आदेश देण्यात आलेला आहे. आमचे कार्यकर्ते बिनधास्त गाड्या चालवतील, असा कारभार चालला आहे. सर्वांनी जिल्हे वाटून घेतले आहेत. अवैध दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामधून मोठी कमाई केली जात आहे, असा खळबळजनक आरोप बावनकुळे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- २३ जानेवारीला ‘राष्ट्रीय सुट्टी’ घोषित करा; ममता बॅनर्जींनी थेट मोदींना पत्र लिहून केली मागणी
- शंभर पिढ्या जरी उतरल्या तरी मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच; संजय राऊतांचा भाजपवर पलटवार
- वाढीव वीज बिलावरून मनसे आक्रमक ; घेणार राजगडावर महत्वाची बैठक!
- वीज बिलावर सामन्यांना दिलासा? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक
- शिक्षणाला वयाची अट नसते ! ५६ व्या वर्षी एकनाथ शिंदेंचं पदवी परीक्षेत घवघवीत यश…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

