नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमती कमी कराव्यात, तसेच साठेबाजांवर कारवाई करावी आणि पुरवठा वाढवण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करा अशा मागण्या ममता बॅनर्जी यांनी पत्राद्वारे मोदींकडे केल्या आहेत.
यासह त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा मुद्दा उपस्थित करत महत्वाची मागणी केली आहे. स्वातंत्र्यलढ्यात अनन्यसाधारण महत्व असलेल्या दिवंगत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती २३ जानेवारीला असते. त्यामुळे, या दिवशी राष्ट्रीय सुट्टी घोषित करावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी पत्राद्वारे केली आहे.
यासोबतच, स्वातंत्र्यापूर्वी एका अपघातात नेताजींचा झालेल्या मृत्यूचे गूढ गेली कित्येक दशके कायम असून अनेक कथा देखील याबाबत सांगितल्या जातात. त्यामुळेच, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ उलगडण्यासाठी तपास करावा, ही मागणी देखील यावेळी बॅनर्जींनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…मग पेंग्विन गॅंगची पार्टी सुरु’; आमदार नितेश राणेंची महाविकास आघाडीवर खोचक टीका
- शंभर पिढ्या जरी उतरल्या तरी मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच; संजय राऊतांचा भाजपवर पलटवार
- वाढीव वीज बिलावरून मनसे आक्रमक ; घेणार राजगडावर महत्वाची बैठक!
- मुंबईचे वाटोळे करण्याचे पाप गेल्या अनेक वर्षात फक्त शिवसेनेनेच केले : भाजपा
- विश्वासघातातून जन्मलेल्या आघाडी सरकारने वीज ग्राहकांचा विश्वासघात केला;भाजपची जोरदार टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

