मुंबई : टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते, त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे.
त्यावरच भाजप आणि मनसेने हा मुद्दा सातत्याने लावून धरत महाविकासआघाडी सरकारची कोंडी केली आहे. लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे.
दरम्यान आज मुंबईमध्ये राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात अली आहे. या बैठकीसाठी राज्यभारतले नेते, सरचिटणीस, जिल्हा अध्यक्ष, विभाग प्रमुख, यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आले असून राजगडावर ही बैठक होणार आहे. या बैठकीत पुढ्यच्या आंदोलनाची काय दिशा असणार आहे हे ठावरलं जाणार आहे.
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढीव वीज बिलाच्या समस्येवर तोडगा काढून सामान्यांना दिलासा देणार का, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोकणाची मुख्यमंत्री निधीकडून उपेक्षा सुरूच,पंतप्रधान सहायता निधीला दिलेली मदत सार्थकी’
- चैत्यभूमीची दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी महानगरपालिकेकडून २९ कोटीचा राखीव निधी
- ती’ नटी भाजपचीच कार्यकर्ती; नाव न घेता कंगणावर राऊतांचा हल्लाबोल
- वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर जनतेला दिलासा देण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल : मनसे
- आयकर विभागाची नोटीस येताच पृथ्वीराज चव्हाण म्हणाले भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
