Share

शिक्षणाला वयाची अट नसते ! ५६ व्या वर्षी एकनाथ शिंदेंचं पदवी परीक्षेत घवघवीत यश…

Published On: 

मुंबई : माणूस हा आयुष्यभर काहीना काहीतरी शिकत असतो त्यामुळे तो नेहमीच एका विद्यार्थ्याच्या भूमिकेत जगत असतो. त्यामुळे शिक्षणाला वयाची अट नसते असं म्हटलं जातं, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही वयाच्या 56 व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन हे वाक्य खरं करुन दाखवलं आहे. नुकताच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला. शिंदे यांनी पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे.

पदवी परीक्षेच्या या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी भावूक ट्विट केलं आहे. “लहान वयातच घराची जबाबदारी खांद्यावर आल्याने एकनाथ शिंदे साहेब यांना एका मत्स्य वाहतूक व्यवसाय कंपनीत वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी नोकरीला सुरुवात करावी लागली. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिंदे साहेबांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले, पण शिक्षणाची जिद्द मात्र त्यांनी सोडली नव्हती. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे किंवा प्रयत्नांती परमेश्वर या म्हणींचा प्रत्यय मला घरातच एकनाथ शिंदे यांच्या अथक व अविश्रांत मेहनतीच्या रूपातून पाहायला मिळतो. अखंड,अविश्रांत मेहनतीची तयारी व जिद्द असेल तर आयुष्यात यशस्वी होता हे शिंदे साहेबांच्या आजच्या निकालातून सिद्ध होतं”, अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी भावना व्यक्त केल्यात.

एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयातून पदवीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत 77.25 टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले आहेत. वयाच्या 56व्या वर्षी पदवीधर होणारे ते राज्यातील बहुदा पहिलेच मंत्री असण्याची शक्यता आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे किंवा प्रयत्नांती परमेश्वर या म्हणींचा प्रत्यय मला घरातच पाहायला मिळतो  शिंदे यांचे पुत्र भारावून गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!