मुंबई – देशातील राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एपीएमसी कायद्यात आपापल्या राज्यात योग्य त्या सुधारणा करा असे खा. शरद पवारांनी पत्र लिहून सांगितले होते मात्र पवार यांचे विद्यमान कृषी विधेयकाला समर्थन आहे असा जाणीवपूर्वक गैरसमज भाजप पसरवत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.
मॉडेल एपीएमसी – २००३ हा कायदा वाजपेयी सरकारने आणलेला होता. देशातल्या अनेक मुख्यमंत्र्यांनी एपीएमसी कायदा लागू केला नव्हता. युपीएचं सरकार आल्यानंतर पवारसाहेबांकडे कृषीमंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर या कायद्याचा अभ्यास केला. कायद्यामधील त्रुटी दूर करून चांगल्या गोष्टी आहेत त्या अनेक राज्यसरकारांनी लागू कराव्यात अशा हेतूने सर्वांशी सकारात्मक चर्चा केली. त्या दृष्टीकोनातून पवारसाहेबांनी वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि त्यात अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थोडीसी दुरुस्ती करुन तो कायदा लागू केला. ज्याचा फायदा कालपर्यंत देशातल्या सर्व शेतकरी बांधवांना होत होता असेही महेश तपासे म्हणाले.
मोदी सरकारने संसदेच्या मागील सत्रात नवीन कृषी विधेयक आणले ते विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. जुना कायदा हा एपीएमसी कायद्याचं रक्षण करणारा होता. त्यापेक्षा आताचा कायदा वेगळा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. एमएसपीचा या कायद्यात उल्लेख नाही, एपीएमसी भविष्यात राहिल की नाही याचाही संदर्भ नाही. खाजगी व्यापाऱ्यांकडून आधारभूत किंमत मिळेल की नाही म्हणूनच शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले आहे असेही महेश तपासे यांनी सांगितले.
दरम्यान या कायद्याविरोधात भारत बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होणार आहे. आणि या जाचक कायद्याच्याविरोधात पवारसाहेब राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ९ डिसेंबरला भेट घेणार असल्याचेही महेश तपासे यांनी सांगितले.
दरम्यान, एका बाजूला हि स्थिती असताना दुसऱ्या बाजूला पवारांनी घेतलेल्या भूमिकेवर आता भाजपने शरसंधान केले आहे. काँग्रेसच्या अजेंड्यामध्ये जे होते तसेच महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात जे लिहिले आहे. तेच मोदी सरकारने कृषी विधेयकाबाबत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून कृषी कायदे आणले आहेत. महाविकास आघाडीचे प्रणेते खासदार शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात एपीएमसी कायद्याचे समर्थन केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांनी ते आत्मचरित्र वाचावे नंतर कृषी कायद्याला विरोध करावा असं भाजपनेते प्रमोद जठार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकार जबरदस्तीने शेतकरी आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे : राष्ट्रवादी
- घराबाहेर बॅरिकेट्स लावत अखिलेश यादवांना शेतकरी आंदोलनात सामील होण्यापासून रोखलं !
- ‘कृषी कायद्यांना विरोध करून आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते’ ?
- शुटिंग दरम्यान मनीष पॉलला कोरोनाची लागण
- मोदी सरकारला दणका! सुप्रीम कोर्टाने दिली नव्या संसद भवनाच्या निर्मितीला तात्पुरती स्थगिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

