Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार

Published On: 

नवी दिल्ली : लोकसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सध्या चर्चा सत्र सुरू आहे. त्यात काल पासून अनेक दिग्गज खासदारांनी भाषण केले. काल  पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहाला आणि देशाला उद्देशून भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस पक्ष, राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच विरोधी पक्षांना चांगलेच धारेवर धरले होते . देशात कोरोना विषाणू पसरविण्यास काँग्रेस जबाबदार आहे. असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रातील मजुरांना काँग्रेसने स्थलांतर करण्यास भाग पाडले. त्यासाठी त्यांना मोफत तिकिटे दिली असा आरोप मोदींनी केला. यावर भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षांकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला असून आम्ही त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या कार्यलयांसमोर आंदोलन करणार आहोत असा इशाराही दिला आहे. तर संसदेत राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रामुळे कोरोना वाढला या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, ” पंतप्रधान मोदींच्या दीड तासांच्या भाषणाकडे खूप अपेक्षेने मी पाहत होते. कारण करोनाच्या महामारीतून आपण बाहेर पडत आहोत. राज्ये अडचणीत आहेत, कोविडच्या तिसरी लाट ओरसत आहे, चीनचा महत्त्वाचा मुद्दा आहे, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे ते भाषण आम्ही ऐकत होतो. पंतप्रधान आपल्या महाराष्ट्राबद्दल जे बोलले त्याचे मला स्वतःला वैयक्तिकपणे दुखः वाटले. आपल्या राज्याबद्दल पंतप्रधान असे का बोलत आहेत याच्या मला वेदना झाल्या. राज्याने भाजपाला १८ खासदार निवडून दिले आहेत आणि मोदी पंतप्रधान असण्यामागे महाराष्ट्रातील मतदारांचाही मोठा वाटा आहे. त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदींनी कोविड सुपर स्प्रेडर म्हणून केला आहे. हे खूप धक्कादायक आहे,” असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

“गुजरात राज्यामधून १०३३, महाराष्ट्रातून ८१७ आणि पंजाबमधून ४०० ट्रेन करोनाकाळात चालवण्यात आल्या. ट्रेन महाराष्ट्र सरकार नाही तर केंद्र सरकार चालवते. आमच्याकडे ट्रेन नाही आम्ही एसटी देऊ शकतो. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यामुळे मला वेदना होत आहेत. मी कुठल्या राज्याचा प्रचार करत नाही आहे. मला देशातल्या प्रत्येक राज्याबद्दल प्रेम आणि आदर आहे. रेल्वे मंत्री असताना पीयूष गोयल यांचे मी अनेकवेळा आभार मानले आहेत. पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रासाठी १२५ श्रमिक स्पेशल ट्रेन देण्यासाठी तयार असल्याचे ट्विट केले होते. पीयूष गोयल महाराष्ट्राला मदत करु पाहत होते, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

      महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!