मुंबई: लोकसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सध्या चर्चा सत्र सुरू आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सभागृहाला आणि देशाला उद्देशून भाषण करत आहेत. यावेळी बोलताना देशात कोरोना विषाणू पासरवण्यासाठी कॉंग्रेस जबाबदार असल्याचा आरोप देखील मोदींनी लावला आहे. यावर राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
यावर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, ज्या महाराष्ट्राने भाजप युतीसोबत केंद्राला १८ खासदार दिले, त्यांच्या मागे महाराष्ट्रातील मतदारांचा मोठा वाटा आहे. त्या सर्वांचा नरेंद्र मोदींनी मोठा अपमान केला आहे. कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर “पंतप्रधान माफी मांगो” आणि निषेधाचे फलक दाखवून आंदोलन करणार, असा इशारा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.
मुळात राज्यात कोरोनाशी लढाई सुरू असताना मविआ कुठे होतं? पत्रकार परिषदा आणि फेसबुक लाइव्हपुरतं काही नेत्यांचं अस्तित्व होतं. @AshokChavanINC, बाळासाहेब थोरात, नाना पटोलेंसह ट्विटरबाज होते कुठे? केंद्राची मदत आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं फील्डवर्क, अशी राज्याची कोरोनाशी लढाई होती.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 8, 2022
कॉंग्रेस नेत्यांच्या या तीव्र आक्षेपानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात परप्रांतातून आलेल्या लोकांना आम्ही तुमची काळजी घेऊ, असा आत्मविश्वासदेखील हे महाविकास आघाडी सरकार देऊ शकलं नाही, हेच त्यांचं अपयश आहे. मुळात राज्यात कोरोनाशी लढाई सुरू असताना मविआ कुठे होतं? पत्रकार परिषदा आणि फेसबुक लाइव्हपुरतं काही नेत्यांचं अस्तित्व होतं. यावेळी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पाटोले कुठे होते, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या:
‘महाविकास आघाडी सरकारच्या दबावामुळेच…’; चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंचे आरोप फेटाळले
आसाम मधील एका पत्रकाराला, प्रश्न विचारला म्हणून पोलिसांनी मारहाण केली.


