Share

‘अमृतकाल में देश उस दौर से गुजर रहा है…’; अमोल कोल्हेंची केंद्रावर काव्यातून टीका

Published On: 

नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) काही दिवसांपूर्वी नथुराम गोडसेची भूमिका केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. आता पुन्हा एकदा अमोल कोल्हेंची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावेळी ही चर्चा त्यांनी केलेल्या संसदेतल्या भाषणामुळे आहे. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावेळी केंद्रावर त्यांच्या भाषणातून चांगलीच टीका केली आहे.

देशात कोरोना संसर्गामुळे (Covid 19) निर्माण झालेली परिस्थिती, सांप्रदायिकता, बेरोजगारीसारख्या महत्वाच्या मुद्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी अमोल कोल्हेंनी कवितेच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.

“अमृतकाल में देश उस दौर से गुजर रहा है,

जब मीडिया सरकार से ज्यादा

विपक्ष से सवाल पूछ रहा है!

और देशभक्ति का सर्टिफिकेट सोशल मीडिया पर,

अंध भक्तों से दिया जा रहा है!

फिर भी उम्मीद है वह दिन आएगा

जब देश का युवा जाग जाएगा,

और सांप्रदायिकता ग्रहण छूटकर

सर्वसमावेशकता का सूरज निकल आएगा!”

पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, देशातील बेरोजगार तरुणांच्या डोक्यात सांप्रदायिकतेचं, भेदभावाचं विष पेरण्याचं काम सुरू आहे. देशातील तरूणांकडून मंदिर तयार कराल की मस्जिद हा प्रश्न विचारला जातोय. उद्या त्यात चर्च आणि गुरुद्वारांचा समावेश होईल. मात्र एक दिवस येईल जेव्हा तुम्हाला तरुण मंदिर मस्जिद सोडून रोजगाराबद्दल प्रश्न विचारतील, असं अमोर कोल्हे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!