🕒 1 min read
पुणे: दिनांक ३ फेब्रुवारी २०२२ रविवार रोजी राफेल नदाल ने डेनील मेद्वेदेवचा ५ सेट चाललेल्या अंतिम सामन्यात पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपनचे २०२२ पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले. हे राफेल नदालचे एकूण २१ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद होते. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस खुल्या स्पर्धेची उत्सुकता ताणली गेली असतानाच महाराष्ट्र ओपन स्पर्धा या वर्षी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वर्षीची महाराष्ट्र टेनिस स्पर्धा टाटा ओपन खुली ओपन टेनिस स्पर्धा म्हणून पण ओळखली जाणार आहे.
टाटा हे महाराष्ट्र ओपनचे अधिकृत प्रायोजक आहेत. याच टाटा ओपन खुल्या टेनिस स्पर्धेत भारतीय जोडीने जोरदार सुरुवात केली आहे. रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या द्वितीय मानांकित भारतीय जोडीने टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेची विजयी सलामी दिली आहे. बोपण्णा-रामनाथन जोडीने अमेरिकेच्या जेम्स सेरेटानी आणि निकोलस मोनरो जोडीचे आव्हान ६-३, ३-६, १०-७ असे परतवून लावले. गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा अलेक्झांडर एर्लेर आणि जिरी वेस्ली जोडीशी सामना होईल. दुसऱ्या सामन्यात मात्र एका भारतीय जोडीला टेनिस सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
युकी भांब्री आणि दिविज शरण या भारतीय जोडीला मात्र पराभव पत्करावा लागला. भारताच्याच साकेत मायनेनी आणि शशीकुमार मुकुंद या पुरुष जोडीने युकी-दिविज जोडीला ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभव केला. युकी-दिविजचा आधी डेनिस नोव्हाक आणि जाओ सौसा या जोडीशी सामना रंगणार होता. मात्र, डेनिसच्या मांडीला दुखापत झाल्याने या जोडीला माघार घ्यावी लागली आणि त्यांच्या जागी मायनेनी-मुकुंद जोडीला मुख्य फेरीत प्रवेश मिळाला.
महत्वाच्या बातम्या:
- राज्यपालांच्या खासगी सचिवपदी सेवानिवृत्त अधिकारी नेमणे चुकीचे – नवाब मलिक
- “मराठी भाषेचा कैवारी असल्याचा टेंभा मिरवायचा नंतर..”, भाजपची महाविकास आघाडीवर टीका
- भारतीय फलंदाजाची जबरदस्त कामगिरी! ५००’च्या स्ट्राइक रेटने ठोकल्या धावा
- गलवान संघर्षात ३८ चिनी सैनिकांचा मृत्यू; ऑस्ट्रेलियन रिपोर्टमधून खुलासा
- हा तर राजकारण्यांच्या खुशामतीचा प्रकार; माजी महापौर विजया रहाटकरांचा पांडेय यांच्यावर आरोप!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
