Share

“बंडातात्या वारकरी संप्रदायाला लागलेला डाग”, रुपाली पाटलांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या वाईनविक्री निर्णयावरून राज्यातील भाजप नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहेत, यावरूनच ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी टीका करत ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार असे म्हंटले आहे. दरम्यान, बंडातात्या यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात रुपाली पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,‘महाराष्ट्राच्या महिला लोकप्रतीनिधी व लोकनेत्याच्या लेकींना दारू पिऊन नाचतात म्हणणारे बंडातात्या वारकरी संप्रदायाला लागलेला डाग आहे.’ तसेच तात्याला येरवड्यात उपचाराची गरज असून समस्त महिलांची त्यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा खळखट्याक अटक आहे, असेही पाटील म्हणाल्या आहेत.

https://twitter.com/Rupalispeak/status/1489201968153501702?s=20&t=199nBYxJja4l6NXDIqQEuQ

दरम्यान, कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असा सवाल करत पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? तसेच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख बंडातात्या कराडकर यांनी केला आहे. तसेच ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे. असे म्हणत उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार असं ते म्हणाले आहेत. अजित पवारांनी दारु विकण्याचा गुण लावला. त्यांनीच मंदिरं खुली करायची नाहीत असं सांगितलं. हे सगळं अजित पवारांचं असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!