Share

U19WC: फायनलमध्ये पोहचल्यानंतर कर्णधार यशला वडिलांकडून मोलाचा सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारताच्या अंडर १९ संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत वर्ल्डकप फायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे. भारताने ९६ धावांनी ऑस्ट्रेलियाला नमवले. भारताला विजयापर्यंत नेताना कर्णधार यश धुलने ११० धावांची धमाकेदार खेळी केली होती. त्याच्या नेतृत्वात संघ फायनल मध्ये पोहचल्यावर यशाच्या वडिलांनी त्याला एक मोलाचा सल्ला दिला आहे.

यशाच्या नेतृत्वात संघ फायनल मध्ये पोहचल्यावर यशाचे वडील विजय सिंग धूळ यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी यशला ” प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखू नका ” असा मोलाचा सल्ला दिला आहे. सोबतच त्यांनी भारतीय संघ वर्ल्डकप जिंकून येईल अशी अशा देखील व्यक्त केली आहे. त्यांनी यशच्या कामगिरी बाबतही सांगितले आहे. ” तो स्वतःवर दबाव येऊ देत नाही. त्याची निर्णय क्षमता चांगली आहे. ज्याचा फायदा त्याला नेतृत्व करताना झाला आहे. ” यशाच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट करिअर घडवण्यासाठी नोकरी सोडली होती.

यश धुलने आयपीएल मेगा ऑक्शनसाठी नाव नोंदवले आहे. त्याची वर्ल्डकप मधील कामगिरी पाहता त्याच्यावर मोठी बोली लागू शकते. भारताची अंडर १९ टीम ५ फेब्रुवारी रोजी इंग्लंडसोबत फायनलमध्ये भिडणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!