🕒 1 min read
ठाणे : गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आनंद आश्रम येथे आले होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देणार असल्याची घोषणा केली. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“शिवसेनेच्या सर्व खासदारांची हीच भुमिका होती की, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने द्रोपदी मुर्मू यांना पांठीबा द्यावा. आम्ही देखील त्यांना आधीच पाठींबा दिलेला आहे. एका आदीवासी समाजाला मुख्यप्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. परंतु उध्दव ठाकरे यांनी आता जी भुमिका घेतली आहे, ती भुमिका अडीच वर्षापूर्वीच घेतली असती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती”, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला.
एकनाथ शिंदे म्हणाले, “सध्या राज्यातील सरकार स्थिर असून ते योग्य आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भातील जो प्रस्ताव दिला आहे. तो योग्य नाही. आम्हाला आता कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नसून राज्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे प्रमुख उद्दीष्ट आहे.”
“गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिंघे यांना वंदन केले आहे. या दोघांच्या आर्शिवादाने युतीचे सरकार राज्यात स्थापन झालेले आहे. या दोघांची जी शिकवण होती. ती म्हणजे सर्वसामान्यांना न्याय देण्याची होती. या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, वारकरी, सर्व समाजातील घटक यांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करणार आहे,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची भुमिका आम्ही घेतली. त्याला आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी पाठींबा देत आहेत. संपूर्ण राज्यभर आम्ही घेतलेल्या भुमिकेला प्रतिसाद मिळत आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. प्रत्येकाला वाटले पाहिजे हे आपले सरकार आहे.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
