Share

एकतर्फी निर्णय घेऊ नये,हे बापटांनी मोदींना सांगावे- रुपाली चाकणकर

Published On: 

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह परिसरात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे या व्हायरसशी साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय अजित पवार यांच्या बैठकीनंतर घेण्यात आला. पुणे शहरात अत्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. 13 जुलै म्हणजे सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. यामध्ये दूध,औषध यांचा समावेश आहे. ज्या वस्तू लागत आहेत, त्या खरेदी करुन घ्या,’ असं आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडून करण्यात आलं आहे.

पुणे शहरात तर कडक लॉकडाऊन असेल, तर जिल्ह्यातील संक्रमण असलेल्या भागातही लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता पुन्हा एकदा शिस्त दाखवत अत्यावश्यक काम नसेल तर घरातच थांबावं लागणार आहे. अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल.

दरम्यान आता या मुद्द्यावरून राजकारण सुरु झालं आहे. पुणे व्यापारी संघानंतर पुण्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे.

‘मास्क लावला नाही, शरीररिक अंतर पाळले नाहीतर कडक कारवाई करा, पण 3 टक्के प्रतिबंधीत क्षेत्रातील लोकांसाठी 97 टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. केवळ अधिकाऱ्यांवर विसंबून लॉकडाऊन सारखा सोपा निर्णय घेऊ नका,’ अशा शब्दात पुण्याचे खासदार आणि माजी पालकमंत्री भाजप नेते गिरीश बापट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी गिरीश बापट यांच्यावर निशाणा साधला.लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्या, असं प्रत्युत्तर दिलं आहे.

गिरीश बापट यांनी पुण्यातील लॉकडाऊनचा निर्णय एकतर्फी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता केल्याचा आरोप केला. तसेच असे निर्णय होत राहिले तर आम्ही यापुढे काय करायचं हे ठरवू, असा इशारा अजित पवार यांना दिला. यावर रुपाली चाकणकर यांनी बापट यांनी हीच हिम्मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणालाही विश्वासात न घेता पहिला लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा दाखवायला पाहिजे होती, असं म्हणत टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या-

धारावीतील कोरोना नियंत्रण हे केवळ RSS आणि अन्य संस्थांमुळे, नितेश राणेंचा दावा

‘राजकीय हितासाठी कॉपी बहाद्दर सरकारचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ,विद्यार्थ्यांच्या आरोग्य काळजीचे दावे खोटे’

लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून पुण्यात कलगीतुरा, बापटांनी अजित पवारांवर केली शेलक्या शब्दात टीका

पक्ष, राजकारण यापलिकडे जाऊन मनसेच्या ढाण्या वाघाने घेतली इंदोरीकर महाराजांची भेट

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!