Share

एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या; जावई गिरीश चौधरी यांच्या कोठडीत १९ जुलैपर्यंत वाढ

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांच्या अडचणी आता आणखीन वाढल्या आहेत. त्यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत १९ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. जमिनीच्या व्यवहाराशी चौधरी यांचा थेट संबंध असल्याने पुढील तपास आणि अधिक चौकशीसाठी आणखी कोठडी आवश्यक असल्याचे ईडीने सांगितल्यानंतर कोर्टाने ही वाढ झाली. चौधरी यांना ५ जुलैला अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून ते ईडीच्या कोठडीत आहेत.

खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीने एकनाथ खडसे यांनाही समन्स बजावले होते. त्यानंतर ईडीने खडसे यांच आठ तास चौकशी केली. यापुढेही जेव्हा जेव्हा गरज भासेल, तेव्हा चौकशीचे समन्स बजावले जाईल, असे ‘ईडी’ने स्पष्ट केले होते. आज त्यांचे जावई चौधरी यांची कोठडी आणखी वाढवल्यामुळे खडसे यांच्यापुढील अडचणी अद्याप संपल्या नसल्याचे दिसते.

नेमके काय आहे प्रकरण ?
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता. रेडीरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे.

खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.

दरम्यान, या प्रकरणात आम्हाला अनेक साक्षीदार सापडत आहेत. काही साक्षीदार पुढील आठवड्यात ईडीच्या कार्यालयात येणार आहेत. त्यामुळे साक्षीदार आणि आरोपी यांचा आम्हाला समोरासमोर तपास करायचा आहे. त्यामुळे ७ दिवसांची ईडी कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीचे वकील हितेन वेनेगावकर यांनी कोर्टात केली. त्यानंतर कोर्टाने १९ जुलै पर्यंत म्हणजे ४ दिवसांची ईडी कोठडी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!