मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात दोन वर्षांनंतर जामीन मिळून तुरुंगाबाहेर आलेला आरोपी विक्रम भावे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामिनाविषयीच्या अटीतून तात्पुरता दिलासा दिला आहे. विक्रमच्या वडिलांचे २५ जूनला निधन झाले आहे. त्या अनुषंगाने विविध विधी व वडिलांशी संबंधित बँकिंगचे व्यवहार करण्यासाठी तीन आठवड्यांसाठी रत्नागिरीत राहण्याची मुभा त्याला देण्यात आली आहे.
६ मे रोजी उच्च न्यायालयानं विक्रम भावेला कठोर अटिशर्तींसह जामीन दिला होता. याप्रकरणी सीबीआयचा तपास अद्याप सुरू आहे. आरोपीविरोधात आरोप निश्चित होणे आणि खटल्याला सुरूवात होणे ही गोष्ट तत्काळ होणे शक्य नव्हते. तसेच आरोपीविरोधात नव्यानं साक्षीपुरावे सापडणं आणि नवे आरोप लागणेही शक्य नाही, असा युक्तिवाद बचावपक्षाने हायकोर्टात केला होता. जो कोर्टाने ग्राह्य धरत त्याला जामीन दिला होता.
कोण आहे विक्रम भावे?
विक्रम भावेची हिंदू विधिज्ञ परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम पाहणारा अशी मूळ ओळख आहे. ४ जून २००८ रोजी ठाण्यातील पनवेलमधील थिएटर आणि गडकरी रंगायतन याठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी विक्रमला १० वर्षांची शिक्षा झाली होती. मधल्या काळात त्याची जामिनावर बाहेर होता. याच दरम्यान डॉ. दाभोळकर यांच्या हत्येच्या कटात तो सहभागी झाल्याचा आरोप आहे.
दाभोळकर हत्येप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि हिंदू जनजागृती समितीचे सदस्य वीरेंद्र तावडे यांची चौकशी केली होती. ज्यातून विक्रम भावेला अटक करण्यात आली होती. डॉ. दाभोळकर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप विक्रम भावेवर असून दाभोळकरांची ओळख पटवण्यात विक्रम भावेचा सहभाग होता. तसेच दाभोळकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल नष्ट करण्यातही भावेनंच मदत केल्याचा आरोपावरून त्याला अटक झाली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘मुंबई विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल’, मनसेचा इशारा
- योगींच्या राज्यात कावड यात्रेला परवानगी; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले
- ‘लोकांच्या लक्षातही येणार नाही अशा प्रकारे मोदी सरकार खिसा कापत आहे’
- कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून चिंता व्यक्त
- पंतप्रधान मोदी वाराणसीत दाखल, १५०० कोटींच्या कामांचे लोकार्पण करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
