औरंगाबाद : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहे. या पार्श्वभुमीवर वैजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभय पाटील चिकटगावकर हे समर्थकांसह लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. दरम्यान या चर्चेस खुद्द अभय पाटील यांनी दुजोरा दिला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघणार आहे.
तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू असून अभय चिकटगावकर यांचा भाजप प्रवेश हा त्याचाच परिपाक असल्याचे समजले जात आहे. माजी आमदार कैलास पाटील पाटील चिकटगावकर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अभय पाटील चिकटगावकर यांनी राजकारणात सक्रिय होत पक्ष संघटनेसह पक्षवाढीची व्यापक भूमिका घेतली होती. युवा पिढीची भक्कम साथ आणि खमक्या कार्यपद्धतीने अभय पाटील यांनी अल्पावधित स्वतः चे राजकीय वलय तयार केले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अभय यांना दिली, मात्र निवडणुकीत त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. विधानसभेच्या निवडणुकीनंतर अभय पाटील हे केवळ पक्षात राहिले मात्र पक्षाच्या कार्यक्रम, मेळाव्याकडे त्यांनी पाठ फिरवली.
राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीत कार्याध्यक्ष म्हणून काम करतांना ते पक्षात पुन्हा सक्रिय होतील असे वाटत असताना झाले मात्र उलटेच. त्यांनी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देत आपण राजकीय बॉम्ब फोडत दिवाळीनंतर फटाक्यांची आतषबाजी करणार असल्याची चाहूल दिली होती. वैजापूर येथे पक्षाच्या परिवार संवाद मेळाव्यात दस्तुरखुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते, मात्र अभय पाटील यांनी प्रदेशाध्यक्षांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली. शिवाय शिऊर येथे आरोग्य मंत्री टोपे यांच्या कार्यक्रमात देखील त्यामुळे ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. आगामी काळात मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यात अभय पाटील हे महत्वाची भूमिका बजावतील असे सांगितले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची- शरद पवार
- ‘क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन या आभासी चलनांचा गैरवापर होऊ नये यासाठी सर्व देशांनी एकत्र यायला हवं’
- माझ्या पगारात तुमचं घर चालवून दाखवा; एसटी कर्मचाऱ्याचे संजय राऊतांना आवाहन
- ‘याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती पण…’, अमरावती हिंसाचार प्रकरणी गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
- मुंबईत भर रस्त्यात अभिनेत्रीला लुटलं ; पोलीसांची एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

