Share

Deepak Kesarkar PC : राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना संपवत आहे – दिपक केसरकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील आपसी भांडण वाढत चालले आहे. एकीकडे बंडखोर एकनाथ शिंदे महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे संघटना मजबूत करण्याबरोबरच सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेवर कोणाचा अधिकार असावा यावरूनही चांगलाच वाद सुरु आहे. दरम्यान, आज बंडखोर आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेना आमदार दिपक केसकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

“आमच्याकडे आकडे आहेत. मात्र आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंविरोधात बोलणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना संपवत आहे. हे आमदार कसं सहन करणार आहेत. शिवसेनेमुळे तुम्ही सत्तेत आला आणि आम्हालाच संपवायचा प्रयत्न करत आहात, असा सवाल दिपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला केला आहे.”

“आम्ही सुरूवातीपासून उद्धव ठाकरे यांना सांगतोय की भाजपसोबत राहिलं पाहिजे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकत्र राहतात. तेव्हाच राज्याचा विकास होतो. पंतप्रधानाचं मातोश्री आणि बाळासाहेब यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. आम्हाला भाजपच्या काळात ज्या अडचणी आल्या त्या उद्धव ठाकरेंना सांगितल्या तेव्हा ते फडणवीसांना बोलायचे तेव्हा कामं व्हायची, मात्र आता तसे होत नाही”, असे दिपक केसरकर म्हणाले.

पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे

संजय राऊत म्हणाले, “पक्ष सोडणाऱ्यांवर काय कारवाई होणार हे संध्याकाळपर्यंत कळेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व निवडणुका लढवू. शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांनी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागू नयेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावर मते मागावी. महाविकास आघाडी एक आहे. आम्ही ६ ठराव पारित केले असून शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीवर चालणार असून संयुक्त महाराष्ट्राच्या विचारधारेशी तडजोड करणार नाही, असा निर्धार केला आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. बंडखोरांवर कारवाई करण्याचे अधिकार मुख्यमंत्री ठाकरे यांना आहेत.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!