🕒 1 min read
मुंबई : पाऊसामुळे आसाम मधील परिस्थिती गंभीर झाली आहे. आसाम मध्ये सर्वच बाजूला पाणी दिसत आहे. पुरामुळे अनेक लोकांची घरे उध्वस्त झाली आहेत. माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये पुरामुळे १० लोकांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे मृत्यू पावलेल्या लोकांचा आकडा ११७ वर गेला आहे. दरम्यान पूरग्रस्तांना मदत म्हणून, मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधी मध्ये २५ कोटी रुपयांची मदत केली आहे.
ही मदत केल्यामुळे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मुकेश अंबानी व त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यासंदर्भात एक ट्विट केले. कठीण काळामध्ये आमच्या मदतीला उभे राहिल्याबद्दल मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांचे मनापासून आभार असे त्यांनी म्हटले आहे.
माहितीनुसार, मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच लोकांनी पूरग्रस्तांना मदत केली आहे. उद्योजकांसोबतच कलाकारांनी सुद्धा पूरग्रस्तांची मदत केली आहे. यामध्ये प्रसिद्ध गायक सोनू निगम बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांनी देखील प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
