Share

Sandeep Deshpande : बाळासाहेब ठाकरे हा विचार कोणाची खासगी मालमत्ता असू शकत नाही – संदीप देशपांडे

Published On: 

मुंबई : आज (२५ जून) शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत यांचीही उपस्थिती आहे. यावेळी शिवसेनेने पाच महत्वाचे ठराव मंजूर केले असून त्यापैकी बाळसाहेब ठाकरे नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही असा महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार टीका केली आहे.

“हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे हा एक विचार आहे आणि विचार हा कुठल्या पक्षाची किंव्हा व्यक्तीची खाजगी मालमत्ता असू शकत नाही”, असे ट्विट करत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरे आणखी काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले आहे. “हिमंत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावावर निवडणूक लढवा”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. तसेच शिवसैनिकांना आज शिवसेना भवनावर जमण्याचे आवाहनही करण्यात आल्याचे कळते आहे. दरम्यान सेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!