🕒 1 min read
Sushma Andhare | कोल्हापूर : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis government) हल्लाबोल करत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभांमधून त्यांनी शिंदे सरकारवर प्रहार केला. कोल्हापुरमध्ये महाप्रबोधन यात्रेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
त्या म्हणाल्या, “शिवसेनेतून अनेकजण आले गेले, पण शिवसेनाला काही फरक पडला नाही, राज ठाकरे, भुजबळ यांनी शिवसेना संपवायचा कधी प्रयत्न केला नाही.” तसेच मोदी टेलिप्रॉम्प्टरवर बोलतात आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) फडणवीसांनी दिलेल्या चिठ्ठ्यांवर बोलतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
“एकनाथ शिंदे निर्णायक पदावर नाहीत. ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या रिमोटचा बाहुला आहेत. त्यांनी रिमोट चालू केला की ते बोलतात, बंद केला की ते थांबतात. देवेंद्र फडणवीस कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार आहेत”, अशा शब्दात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका केली.
त्या पुढे म्हणाल्या की, मी राष्ट्रवादीची कधीही सदस्य नव्हते, तरीही गुलाबराव पाटील म्हणतात, मी राष्ट्रवादीतून आले. भाजपकडे स्वतःचे असे काय होते? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लेकरांना मांडीवर घेऊन भाजपने त्यांना मोठे केले. खोके शब्द उचारला, तर कायदेशीर कारवाई करणार असे म्हटले जाते. अंधारे म्हणाल्या की, माझ्या उंचीवरुनही टीका केली गेली, पण फडणवीस यांची उंची आणि वजनही माहीत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | “डोळ्याला पाणी लाऊन म..म म्हणणारे हिंदुत्व…”; सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
- Sushma Andhare | “गुजरातला मुख्यमंत्री आहेत की” ; सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला
- Hera Pheri 3 | हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमारचे होणार पुनरागमन?, सुनील शेट्टीने दिले उत्तर
- Chandrakant Khaire | मन स्वच्छ ठेवून बाळासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घ्या – चंद्रकांत खैरे
- Skin Care Tips | त्वचेवरील चमक वाढवायची असेल तर, चेहरा धुतल्यानंतर वापरा ‘या’ गोष्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
