Share

Shivsena : “बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कोणालाही वापरता येणार नाही”

Published On: 

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. गेले पाच दिवस सुरु असलेल्या राजकीय घडामोडींनंतर आज (२५ जून) शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडत आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उपस्थिती आहेत. या कार्यकारिणीत शिवसेनेकडून पाच महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत.

मुंबईतील शिवसेना भवनात पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात कार्यकारिणीची बैठक होत आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले आहे. या बैठकीत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कोणालाही वापरता येणार नाही. असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तसेच शिवसैनिकांना आज शिवसेना भवनावर जमण्याचे आवाहनही करण्यात आल्याचे कळते आहे.

कार्यकारणीतील पाच महत्वपूर्ण ठराव

शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि कायम राहिल. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर कार्यकारिणीचा विश्वास, त्यांना पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार आहेत. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे अधिकार पक्षप्रमुखांना आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कोणालाही वापरता येणार नाही. शिवसेनेचे मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्त्वाशी बांधिलकी कायम राहिल. असे हे पाच ठराव मंजूर करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!