Share

‘नवाबभाई ये पब्लिक है, सब जानती है’, गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई : राज्यातील वातावरण उन्हामुळे चांगलंच तापलंय. त्यातच कोरोनाचे औषध आणि लसीकरणावरूनही राजकारण गरम झालंय. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकावर केलेल्या कारवाईनंतर भाजप नेते आक्रमक झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात भाजपने रान पेटवले आहे. आ.गोपीचंद पडळकर यांनीही नवाब मलिक यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

पडळकर म्हणाले, नवाब मलिक पालकमंत्री असलेल्या गोंदिया जिल्ह्यात काल एकाच दिवसात ॲाक्सिजन अभावी १५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्या रुग्णांच्या नातेवाईकांना आधार देण्याऐवजी, स्वत:चे पाप झाकण्यासाठी आपल्या अकार्यक्षमेतवर पांघरूण घालण्यासाठी ते भाजपावर बेछूट आरोप करत आहेत. पण हा महाराष्ट्र आहे. नवाबभाई ये पब्लिक है सब जानती है’ असा पलटवार पडळकर यांनी केला.

पंतप्रधान मोदींनी औषधांचा साठा करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देत किंमती कमी केल्यात. संकटाच्या काळात जे उद्योजक महाराष्ट्रात रेमडेसिविरचा पुरवठा करण्यासाठी स्वत: पुढाकार घेत आहेत. पण त्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्याची योजना ठाकरे सरकारने आखली आहे. यातून आपला काय हेतू आहे हे दिसत आहे.

पडळकर पुढे म्हणाले की, ‘असं वाटतं की, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणेंवर आता शंभर कोटीचं वसुलीची जबाबदारी किंवा टार्गेट दिलं आहे. महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलं आहे म्हणून भाजपवर आरोप करत आहे’.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!