Share

IPL 2022 SRH vs CSK : सनरायझर्स हैदराबादसमोर मोठं टेन्शन..! ‘स्टार’ खेळाडूला एकाच जागेवर झाली दोनदा दुखापत!

Published On: 

पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सुसाट सनरायझर्स हैदराबाद संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. हैदराबाद गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे, पण चेन्नई सुपर किंग्जकडून (SRH vs CSK) त्यांचा १३ धावांनी पराभव झाल्याने त्यांच्यासाठी प्लेऑफची शर्यत आणखी आव्हानात्मक झाली आहे. या सामन्यात हैदराबादला वॉशिंग्टन सुंदरची उणीव भासली आणि पुढच्या सामन्यातही हैदराबादला या खेळाडूची उणीव भासू शकते.

संघाचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी खुलासा केला, की वॉशिंग्टन सुंदरला तो ज्या हाताने गोलंदाजी करतो त्याच हाताला पुन्हा दुखापत झाली आहे. त्यामुळे तो सीएसकेविरुद्ध गोलंदाजी करू शकला नाही. वॉशिंग्टनने त्याच्या गोलंदाजीच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे ३ सामन्यांतून बाहेर पडल्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्ध पुनरागमन केले होते, परंतु चेन्नईविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना पुन्हा त्याच हाताला दुखापत झाली.

https://twitter.com/sportstigerapp/status/1521055660191862786

तो खालच्या क्रमाने फलंदाजीसाठी उतरला असला तरी त्याला केवळ २ चेंडूंचा सामना करता आला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत मूडी म्हणाले, ”सुंदरच्या गोलंदाजीच्या हाताला झालेली दुखापत दुर्दैवी आहे. दुखापत आधी पूर्णपणे बरी झाली होती, पण तोच हात पुन्हा दुखावला गेला. टाके घालण्याची गरज नाही. दुखापतीमुळे वॉशिंग्टन गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नव्हता आणि याचा परिणाम सामन्यावर झाला.”

असा रंगला सामना…

धोनीच्या नेतृत्वात पुन्हा खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये तिसरा विजय नोंदवला. लीगच्या ४६वा सामन्यात चेन्नईने सनरायझर्स हैदराबादला (SRH vs CSK) १३ धावांनी मात दिली. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्याच्या अंगउलट आला. ऋतुराज गायकवाड (९९) आणि डेव्हॉन कॉनवे (नाबाद ८५) यांच्या दमदार सलामीच्या जोरावर चेन्नईने हैदराबादला २०३ धावांचे आव्हान दिले. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी १८२ धावा जोडल्या. प्रत्युत्तरात हैदराबादची गाडी २० षटकात १८९ धावांपर्यंतच थांबली. हैदराबादकडून निकोलस पूरनने नाबाद ६४ धावांची झुंज दिली.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!