Share

‘भाजपने घराणेशाहीचा ढोल बडवणे बंद करावे’; नवाब मलिकांचे वक्तव्य

Published On: 

पणजी: गोवा विधानसभेच्या (Goa Elections) पार्श्वभूमीवर पणजीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) आणि प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी गोव्याचे प्रदेश सरचिटणीस अनिल झोलापुरे आणि गोवा प्रदेश प्रवक्ते अविनाश भोसले उपस्थित होते. यावेळी बोलताना नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना नवाब मलिक म्हणाले, गोव्याच्या जनतेने २०१७ च्या निवडणुकीत भाजपला (BJP) नाकारले होते. काँग्रेसच्या पारड्यात बहुमत होते. त्यानंतर सत्ता मिळाल्यानंतरही भाजपने गोव्यातील जनतेला न्याय दिला नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली. गोव्यात भाजपच्या ४० उमेदवारांची यादी पाहिली तर त्यामध्ये सर्व आयात केलेले उमेदवार आहेत. मुख्यमंत्री पदाचा दावेदार सोडला तर सर्व उमेदवार इतर पक्षातील आहेत, असं मलिक म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेत बोलताना आम्ही घराणेशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले. पण दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये ५६ अशा उमेदवारांना तिकीट दिले आहे, ज्यांचे सगेसोयरे राजकारणात आहेत. तुम्हाला घराणेशाहीचे वावडे आहे तर मग गोव्यामध्ये दोन पती-पत्नीच्या जोड्या निवडणूक कशा काय लढवू शकतात? बाबूश आणि त्यांची पत्नी तसे राणे पती-पत्नी निवडणूक लढवत आहेत. मग घराणेशाहीचा ढोल भाजप कधीपर्यंत बडवत राहणार?, असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!